कन्नड, (प्रतिनिधी) महाविद्यालयीन परीक्षेसाठी दुचाकीने जात असताना देवगाव रंगारी परिसरात भीषण अपघात होऊन, १९ वर्षीय विद्यार्थी गंभीर जखमी झाला. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी घडली.
ओम कडूनाथ तुपे (रा. पिराचे बाबुळगाव, ता. वैजापूर, ह.मु. वाळूज) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. ओम हा छत्रपती संभाजीनगर येथून शिऊर येथे महाविद्यालयाचे देवगाव रंगारीजवळील पुलावर वळणाचा अंदाज न आल्याने घडली घटना ओम तुपे परीक्षा देण्यासाठी जात असताना सकाळी सुमारे ९ वाजता देवगाव रंगारीजवळील पुलावर वळणाचा अंदाज न आल्याने त्याची दुचाकी पुलाच्या कठड्याला जोरात धडकली. या अपघातात ओम गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच त्यास देवगाव रंगारी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून प्रथमोपचार
करण्यात आले.
त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी मात्र, उपचार सुरू असतानाच घाटीत हलविण्यात आले. सकाळी सुमारे ११.३० वाजता त्याची प्राणज्योत मालवली. घटनेची नोंद देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात घेण्यात आली असून तपास सहाय्यक फौजदार भीमराव चेळेकर व पो.कॉ. केसरसिंग राजपूत करत आहेत.













